कृष्णा कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढून विकासाच्या मार्गावर आणला : चेअरमन डॉ. सुरेश भोसले

सातारा : य. मो. कृष्णा कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढून विकासाच्या मार्गावर आणला आहे. कारखाना आदर्श बनवला आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले आहे. शेरे (ता. कराड) येथे य.मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. अतुल भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, संचालक बाजीराव निकम, जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रियांका साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. शामबाला घोडके, पंचायत समिती सदस्या सौ. वर्षा निकम, माजी सदस्य बाळासाहेब निकम, सरपंच सौ. मनिषा शिरतोडे यांची उपस्थिती होती.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, २०१५ मध्ये कारखान्याची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर होती. कामगारांचे पगार, व्यापाऱ्यांची देणी तसेच ऊसतोडणी व वाहतूकदारांचे पैसे देण्यासाठी निधी उपलब्ध नव्हता. मात्र सभासद, शेतकरी आणि कामगारांच्या विश्वासाच्या बळावर कारखाना वाचवून आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यात आले. आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कार्यक्षेत्रातील पाणंद रस्ते, शेतरस्ते, पाणीपुरवठा योजना आणि सिंचन सुविधांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. यावेळी हणमंत सूर्यवंशी, गोंदीचे सरपंच सुबराव पवार, ब्रम्हानंद पाटील, वसंतराव थोरात, वसंतराव सावंत, गणेश शेवाळे, सरिता निकम, नारायण शिंगाडे, विनायक धर्मे, नितीन बाकले, राजेंद्र दुर्गावळे, सुनिल शिंगाडे, चेअरमन अशोकराव पाटील, वैभव पाटील आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here