महाराष्ट्र : राज्यातील ३२ साखर कारखान्यांनी थकवली २०१ कोटी एफआरपी, शेतकऱ्यांत नाराजी

पुणे : आगामी हंगामाची चर्चा सुरु झाली असली तरी राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मागील हंगामातील कोट्यवधी रुपये थकीत ठेवले आहेत. मागील गाळप हंगामातील एफआरपी थकविलेल्या १५ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई करूनही फारसा फरक झालेला नाही, असे दिसून येते. गाळप हंगामात राज्यातील २१० साखर कारखाने सहभागी झाले होते. यापैकी काही साखर कारखाने बंद होऊन सहा तर काहींना पाच महिने झाले आहेत.

काही कारखाने बंद होऊन सात महिन्यांचा कालावधी झाला आहे. साखर कारखाने बंद झाल्यापासून शेतकरी ऊस उत्पादक पैशांच्या प्रतीक्षेत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, राज्यातील ३२ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना मागील हंगामातील उसाचे २०१ कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत. साखर आयुक्तालयाने एफआरपी थकविलेल्या १५ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई केली आहे. मागील हंगामात आणलेल्या उसाचे २०१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाहीत. जिल्ह्यातील व राज्यातील इतर साखर कारखाने एफआरपीपेक्षा अधिक पैसे चुकते करून पुढच्या हंगामाची तयारी करीत असताना हे कारखाने मात्र मागील वर्षीची एफआरपी देऊ शकलेले नाहीत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here