महाराष्ट्र : राज्यात यंदा १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरु होण्याची शक्यता

पुणे : सध्या साखरेचे दर ६५ ते ७५ रुपये प्रतिकिलो झाले आहेत. भाव नियंत्रणासाठी केंद्र शासनाच्या सूचनांनुसार राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन साखर आयुक्तालयाने केले आहे. राज्यातील २० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला असून, यंदा दोन लाख टनाने साखर उत्पादन घटेल, असा अंदाजही आयुक्तालयाने वर्तविला आहे.

राज्यात मागील गाळप हंगामात एक हजार ४५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यावेळी राज्यातील सुमारे २०० साखर कारखान्यांनी इथेनॉल वगळून ९९ लाख टन साखर उत्पादित केली होती. यात सोलापूर जिल्ह्यातील ३६ कारखान्यांचा मोठा वाटा होता. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यासंदर्भातील नियोजन शासनाला कळविणार आहोत. मंत्रिमंडळाची उपसमिती त्यासंदर्भातील अंतिम निर्णय घेईल, अशी माहिती साखर संचालक केदारी जाधव यांनी दैनिक ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here