महाराष्ट्र : कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी लोकवर्गणीतून उभारणार ऊस रिकव्हरी प्रयोगशाळा, राज्यातील हा पहिलाच उपक्रम

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचे वजन आणि रिकव्हरी एकाच ठिकाणी समजावी, तसेच साखर उद्योगात पारदर्शकता यावी, यासाठी शेतकरी वजनकाट्यावर ऊस रिकव्हरी मोजणारी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचे वजन आणि रिकव्हरी एकाच ठिकाणी समजावी, तसेच साखर उद्योगात पारदर्शकता यावी, यासाठी शेतकरी वजनकाट्यावर ऊस रिकव्हरी मोजणारी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम असून, त्यासाठी आवश्यक निधीचे संकलन या महिन्याअखेर पूर्ण करण्याचे आवाहन आंदोलन अंकुश संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे यांनी केले.

रविवारी (ता. २) शेतकरी वजनकाट्यावर आंदोलन अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी चुडमुंगे म्हणाले की, कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा नदीकाठचा परिसर देशातील सर्वाधिक ऊस रिकव्हरी देणारा पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र, साखर कारखान्यांच्या सरासरी रिकव्हरीवर आधारित एफआरपी पद्धत लागू झाल्यानंतर अनेक कारखान्यांनी सरासरी रिकव्हरी कमी दाखवण्यास सुरुवात केली. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत उसाचे दर अडीच ते तीन हजार रुपयांच्या आसपासच राहिले.

ChiniMandi WhatsApp Channel

ते म्हणाले की, कारखाने जाहीर करत असलेली रिकव्हरी अचूक आहे की नाही, याची स्वतंत्र पडताळणी करण्यासाठी शासनाकडे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून स्वतंत्र रिकव्हरी प्रयोगशाळा उभारून वस्तुस्थिती शेतकऱ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमामुळे साखर उद्योगातील पारदर्शकता वाढण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रयोगशाळेतील रिकव्हरी मोजमापावर कोणत्याही प्रकारचा तांत्रिक आक्षेप घेता येऊ नये, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त डिजिटल पोलॅरोमीटर बसविण्यात येणार आहे. यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) मान्यताप्राप्त आधुनिक उपकरणे खरेदी करण्यात येणार असून, त्यासाठी अधिक खर्च अपेक्षित असला तरी लोकवर्गणीतून निधी उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बैठकीला राकेश जगदाळे, दीपक पाटील, उदय होगले, नागेश काळे, संजय चौगुले, उद्धव मगदूम, सचिन हेरवाडे, रशीद मुल्ला, देवेंद्र चौगुले, अनिल हुपरीकर, धनाजी माने, पिंटू ढेकळे, धनंजय जगनाडे, सारंग परीट, सर्जेराव बाबर, प्रकाश पाटील, अनिल केस्ते, भूषण गंगावणे, अमोल गावडे, प्रमोद नाईक, पृथ्वीराज चुडमुंगे, शशिकांत काळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here