महाराष्ट्र : यंदा राज्यात ऊस गाळपात साताऱ्याचा ‘जरंडेश्वर’, तर साखरनिर्मितीत कोल्हापूरचा ‘जवाहर’ अव्वल

पुणे: राज्यातील सर्व साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपला आहे. हंगामात १०४५ लाख टन उसाचे गाळप आणि ९९ लाख १८ हजार क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे. चालू हंगामातही ११० लाख टन साखरनिर्मिती होईल असे अंदाज होते. परंतु उसाच्या वजनात घट झाल्याने ९९ लाख टनांवर गाडे अडले. तरीही उत्तर प्रदेशाला राज्याने मागे टाकले आहे. राज्यात गाळपात सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखाना तर साखरनिर्मितीत कोल्हापूरचा जवाहर सहकारी साखर कारखाना अव्वल ठरला आहे. राज्यातील केवळ सतरा कारखाने दहा लाख टनांपेक्षा अधिक गाळप करू शकले.

राज्यात साखर उतारा (९.९७) आणि साखरनिर्मिती (५२ लाख टन) याबाबत सहकारी कारखानेच सरस ठरले आहेत. राज्यात यंदा गतहंगामापेक्षा १९ लाख टन जादा साखरनिर्मिती झाली असली तरी हंगाम सरासरी शंभर दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्याच्या इतिहासात गत हंगामापासून प्रथमच खासगी कारखान्यांची संख्या सहकारी कारखान्यांपेक्षा वाढली आहे. दोन्हींनी गाळप जवळपास समान केले आहे. उसाचे आगार समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश कारखाने फेब्रुवारीअखेर बंद झाले. केवळ पन्नास कारखान्यांचा हंगाम पुढे गेला. तसेच राज्यात एकीकडे शंभर दिवसावर आलेला हंगाम आणि साखर, इथेनॉल, वीज या तिन्ही घटकांना भाव नसणे आणि दुसरीकडे वाढते खर्च आणि कर्ज यामुळे साखर उद्योग कोंडीत सापडल्याचे चित्र दिसले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here