कर्नाटकातील कारखान्यांसोबत मंडलिक साखर कारखाना गाळप सुरू करणार : अध्यक्ष, माजी खासदार संजय मंडलिक

कोल्हापूर : येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कारखान्याचा २७व्या हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन झाले. कारखान्याचे संचालक नेताजी पाटील व त्यांच्या पत्नी अनिता पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन झाले व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते अग्निप्रदीपन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष, माजी खासदार संजय मंडलिक होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य विलास पाटील उपस्थित होते. मंडलिक कारखाना शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेनंतर सुरू होईल, मात्र, कर्नाटकने जर लवकर कारखाने सुरू केले तर त्यांच्यासोबत आपल्यालादेखील कारखाना सुरू करावा लागेल, असे मंडलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.

अध्यक्ष मंडलिक यांनी सांगितले की, आमच्या कारखान्याकडे एकूण ८ हजार ५०० हेक्टर उसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कारखाना १२० दिवस चालून ६ लाख टनाचे गाळप होईल, अशी आमची खात्री आहे. यंदा पावसाअभावी उसाची म्हणावी तशी वाढ झाली नाही. त्यामुळे एकरी उत्पादन देखील घटणार आहे. प्राचार्य विलास पाटील यांनी कारखान्याच्या निमित्ताने लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी सहकाराचे मंदिरच उभे केले आ,हे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कुराडे, संचालक के. डी. शिंदे, वीरेंद्र मंडलिक, शिवाजीराव इंगळे, प्रकाश पाटील, आनंदराव फराकटे, समरजित मंडलिक उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here