मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पाणीपट्टी माफ करण्याची आमदार प्रवीण स्वामी यांची विधानसभेत मागणी

लातूर : निसर्गाचा लहरीपणा आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे मराठवाड्यातील शेतकरी आधीच संकटात आहे. अशातच जलसंपदा विभागाकडून उसासाठी आकारली जाणारी पाणीपट्टी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरत आहे. पाणीपट्टीचे नियमित दर खरीप हंगामासाठी १,८९० रुपये, रब्बी हंगामासाठी ३,७८० आणि उन्हाळी हंगामासाठी ५,६७० रुपये प्रतिहेक्टर पाणीपट्टी आकारली जाते. ही रक्कम वेळेत न भरल्यास पन्नास टक्के दंड आणि १२ टक्के व्याज लावले जाते. त्यामुळे हा बोजा प्रतिहेक्टर तब्बल २२,५०० पर्यंत जातो. मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर असणारा पाणीपट्टीचा अन्यायकारक बोजा कमी पूर्णपणे माफ करण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रवीण स्वामी यांनी विधानसभेत केली.

आमदार प्रवीण स्वामी यांनी विधानसभेत मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यासाठी स्वतंत्र आणि सवलतीचे सिंचन नियम लागू करण्यात यावेत. मराठवाड्यात उसाचे हेक्टरी उत्पन्न अवघे ४० ते ५० हजार रुपये असताना, त्यातील अर्धी रक्कम पाणीपट्टीतच जाते. मराठवाड्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता उसाच्या पाणीपट्टीत मोठी कपात करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांकडील ५० टक्के दंडाची रक्कम आणि १२ टक्के व्याज पूर्णपणे माफ करावे. विविध प्रलंबित मागण्यांवर निर्णय घेऊन मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार स्वामी यांनी केली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here