नांदेड : कवळे समूहाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर १७१ कोटी जमा; तिन्ही कारखान्यात ६ लाख १२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप

नांदेड : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी कवळे गुरुजी उद्योग समूहाच्या वतीने कुसुमनगर वाघलवाडा येथील एमव्हीके साखर कारखाना, डॉ. शंकरराव चव्हाण गूळ पावडर व सिंधी येथील गूळ पावडर कारखाना अशा तिन्ही साखर कारखान्याच्यावतीने ६ लाख १२ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करून शेतकऱ्यांना १७१.३० कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कवळे पाटील यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा व सुशिक्षित बेरोजगारांच्या मदतीसाठी सहकार्याचा हात पुढे करीत मारोतराव कवळे गुरुजींनी या भागात साखर व गूळ कारखाने उभारले. या माध्यमातन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी भाव देण्याचे काम जिल्ह्यातून कवळे गुरुजी यांनीच केले आहे. समूहाच्या माध्यमातून आतापर्यंत ६ लाख १२ हजार मेट्रीक टन ऊस गाळप करून त्याचा आलेख समोर मांडला आहे. ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुजी उद्योग समूहाकडे ऊस गाळपाला दिला. त्या शेतकऱ्यांना २५०० रुपये भाव देऊन पहिले बिल काढले होते आणि जे या समूहाचे शेतकरी सभासद असतील त्यांना मात्र २०० रुपये वाढवून २७०० भाव डिसेंबरपर्यंत दिला. १ जानेवारी ते मार्चपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी ऊस दिला त्यांच्या ऊसाला दर पंधरा दिवसांनी ५० रुपये मेट्रिक टनाला भाव दिल्याने हा भाव ३ हजारावर गेला, असेही संदीप कवळे यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel

शेतकऱ्यांच्या शेतीचे उत्पादन उत्पन्न पाच पटीने वाढवण्यासाठी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटल पाठवून प्रशिक्षणासाठी आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांना पाठविले त्याचा फायदा शेतकरी घेत असून एकरी शंभर टन ऊस काढत आहेत. त्यामुळे कवळे गुरुजींचे खरे स्वप्न पूर्ण झाल आहे. एवढेच नाही तर आगाम काळात दररोज ५ ते ७ हजान मेट्रिकक टन ऊस गाळप झाले पाहिजे या अनुषंगाने गुरुजींन चौथा कारखाना उभारण्याचे ठरवले आहे. या कारखान्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त कारखाना दररोज पाच ते सह हजार मेट्रिक टन ऊस गाळप्प करणार आहे. इथेनॉल निर्मितीच्या प्रोजेक्टचे भूमिपूजन नुकतेच झाले असून पुढच्या हंगामात इथेनॉल व वीज निर्मितीतून शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीचा भाव देत येणार आहे. तसेच बेरोजगान तरुणांच्या हातालाही रोजगान मिळणार असल्याचे कवळे यांनी सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here