नाशिक : गोदावरी कालव्याचे आवर्तन बंद, हजारो हेक्टरवरील ऊस पीक धोक्यात

नाशिक : गोदावरी कालव्यातून सोडलेले शेतीचे आवर्तन पाऊस लांबणीवर पडण्याने तातडीने बंद करण्यात आले आहे. त्यामुळे राहाता, कोपरगाव, सिन्नर, वैजापूर तालुक्यातील हजारो हेक्टर ऊस पिक धोक्यात आले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यातील धरणे आणि जायकवाडी धरण भरली, तरीही केवळ व्यवस्थित नियोजन केले नसल्याने शेती उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आगामी आठवड्यात, २० जून नंतर मान्सूनचे आगमन होईल, असे हवामान खात्याने जाहीर केले असले तरी शेतकरी धास्तावले आहेत. पाऊस पडला तरच पिके वाचू शकतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यावर्षी जलसंपदा खात्याने फेब्रुवारीच्या आधी दोन आणि पंधरा मार्च ते मे या कालावधीत दोन अशी चार आवर्तने करणे गरजेचे होते. मात्र चारपैकी फक्त तीन आवर्तने शेतकऱ्यांना मिळाली. पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने ऊस पिकाला तसेच इतर पिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही. परिणामी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पाण्याचे योग्य नियोजन झाले असते तर अशी परिस्थिती उद्भवली नसती असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत जलसंपदा विभागाची निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी सांगितले की, प्रत्येक आवर्तनाचे योग्य नियोजन करणे गरजेचे होते. तसेच झाले असते तर गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात आणीबाणीची परिस्थिती उद्भवली नसती.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here