नाशिक : ‘नासाका’ साखर कारखाना कामगारांची देणी लवकरात लवकर मिळवून देणार – कामगार नेते विष्णुपंत गायखे

नाशिक : नासाका साखर कारखाना प्रश्न सोडविण्याकरता शेतकरी, कामगार यांची एकजूट करू, असे प्रतिपादन कामगार नेते विष्णुपंत गायखे यांनी केले. नासाका कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कारखाना कार्यस्थळावरील मारुती मंदिरात कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायखे यांनी कारखाना बंद झाल्यानंतरही कामगारांना सहा कोटी रुपये मिळविण्यास यश आले आहे. उर्वरित रकमा तसेच कामगार करार करण्याकरिता कामगार न्यायालयात केसेस दाखल असून, प्रॉव्हिडंट फंड आयुक्तांनी कामगारांची फंडाची उर्वरित रकम एक महिन्याच्या कालावधीमध्ये मिळवून देण्याकरिता प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोसायटीस तीन कोटी रुपये मिळाले. त्यापैकी एक कोटी ९४ लाख वाटप करण्यात आले. उर्वरित रकम व व्याज असे एक कोटी १५ लाख पर्यंतची रकम अद्याप वाटप झालेली नाही. सोसायटीचे प्रशासक आढाव व ऑडिटर बर्वे यांनी लेखापरीक्षण झाल्यानंतर लगेचच रक्कम देण्याकरता प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन गायखे यांनी दिले. याप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचारी प्रायव्हेट फंड संघटनेचे नामदेवराव बोराडे यांचा गौरव करण्यात आला तर कामगारनेते विष्णुपंत गायखे यांनी केलेल्या कामाबद्दल अभिनंदनचा ठराव संमत करण्यात आला.

ChiniMandi WhatsApp Channel

युनियनचे अध्यक्ष शिवाजीराव गायधनी व सचिव अनिल गायधनी यांनी यापुढे कामगारांचे प्रश्न सोडविण्याकरिता सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले. मेळाव्यास बाजार समितीचे उपसभापती जगनाथ कटाळे, खंडेराव घेळ, पंडितराव सोनवणे, सुधाकर दळवी, कारभारी वारंगसे, पोपटराव डावरे, सुदाम नवले, सुभाष हुळहुळे, दिनकर गायधनी, सोमनाथ नरवडे यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here