राज्यात १८० साखर कारखान्यांनीच दिली १०० टक्के एफआरपी; ऊस उत्पादकांचे अद्याप १९४ कोटी रुपये थकीत

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी २०२५-२६ च्या गळीत हंगामातील ऊस उत्पादकांना देय असलेल्या एफआरपीपैकी ९९.५२ टक्के रक्कम अदा केली आहे. साखर आयुक्लतायाच्या १५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अहवालानुसार, राज्यातील २१० साखर कारखान्यांनी आतापर्यंत १,०४५.६३ लाख टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्यांनी प्रत्यक्ष एफआरपीपोटी ४० हजार २५२ कोटी रुपये अदा केले असून, ऊस उत्पादकांची १९४ कोटी रुपयांची एफआरपी अद्याप थकीत आहे.

२०२५-२६ च्या हंगामात एच अँड टीसह उसाची एकूण सकल एफआरपी ४० हजार ४४६ कोटी रुपये होती. या तुलनेत कारखान्यांकडून ४१ हजार ७३० कोटी रुपये अदा करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, एच अँड टीची रक्कम वगळून केवळ प्रत्यक्ष एफआरपीची तुलना केल्यास ४० हजार २५२ कोटी रुपये अदा झाले असून, १९४ कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

राज्यातील ऊस उत्पादकांना प्रत्यक्ष एफआरपी अदा करण्याचे प्रमाण ९९.५२ टक्के नोंदले गेले आहे. राज्यातील १८० साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना १०० टक्के एफआरपी अदा केली आहे. तर २६ कारखान्यांनी ८० ते ९९.९९ टक्के एफआरपी दिली आहे. अद्याप काही कारखान्यांकडून एफआरपीची पूर्ण रक्कम अदा होणे बाकी असल्याने संबंधित ऊस उत्पादकांना त्यांच्या थकीत रकमेची प्रतीक्षा करावी लागत आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here