पाकिस्तानवर जगाचा विश्वास नाही, आयएमएफ-वर्ल्ड बँकेच्या रेटिंगमधून दिवाळखोरी स्पष्ट

पाकिस्तान आज मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. देशातील जनता भुकेने तळमळत आहे. तरीही एखादा अपवाद वगळता जगातील कोणताही देश त्याची मदत करण्यास तयार नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही कंगाल झालेल्या या देशाला मदतीचा अद्याप हात दिलेला नाही. यादरम्यान आयएमएफ, वर्ल्ड बँकेपासून ते आशियाई विकास बँकेने देशाचा विकास दर अनुमान जाहीर केले आहे. त्यामधून पाकिस्तानवर कोणाचाच विश्वास उरला नसल्याचे स्पष्ट होते. हे रेटिंग म्हणजे पाकिस्तानच्या दिवाळखोरीचे चित्र असल्याचे म्हटले जात आहे.

आजतक मधील वृत्तानुसार, पाकिस्तानात महागाईने सगळ्यांची कंबर तोडली आहे. जवळपास ३५ टक्क्यांवर महागाईचा दर पोहोचला आहे. सरकारने यात आणखी वाढ होण्याचा इशारा दिला होता. देशातील जनतेला आट्यापासून दुधापर्यंत, विजेपासून ते गॅसपर्यंत सर्व बाबींसाठी झुंज द्यावी लागत आहे. पाकिस्तानवर अब्जावधी रुपयांचे कर्ज आहे. एकूण कर्ज आणि देणी ही ६० ट्रिलियन पाकिस्तानी रुपये आहेत. देशाच्या जीडीपीच्या ८९ टक्क्यांवर हा आकडा आहे. यात ३५ टक्के हिस्सा चीनचा आहे. हे लक्षात घेवून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने FY२३ मध्ये पाकिस्तानचा आर्थिक विकास दर घटवला आहे. हा दर ०.५ टक्के राहिल असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी जागतिक बँकेने पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचा विकास दर ३.५ टक्क्यांवरून घटवून २ टक्क्यांवर आणला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here