फलटण : श्रीराम कारखान्याची निवडणूक प्रक्रिया स्थगित, प्रशासकपदी प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती

फलटण : येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. त्यानंतर याचिकाकर्ते विश्वासराव भोसले यांनी कारखान्यावर प्रशासक नेमावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार कारखान्यावर प्रशासक म्हणून फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे फलटण शहराध्यक्ष अनुप शहा यांनी ही माहिती दिली. कारखान्याच्या मतदार याद्या सदोष असल्याचा आक्षेप सभासदांनी नोंदवला आहे.

निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी मतदार याद्या सदोष असून, सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक मतदार याद्यांमध्ये विविध गोष्टींचा समावेश केलेला नाही. त्यामुळे कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी सरकारकडे केलेली होती. त्यासोबतच भोसले यांनी कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे. याबाबत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही पारदर्शीपणे व्हावी असे सांगत आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here