पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन इंधन सेल अंतर्देशीय जलमार्ग जहाज लाँच करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यात केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्राला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी यानी २७ फेब्रुवारी रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरला (व्हीएसएससी) भेट दिली. संध्याकाळी मदुराई, तामिळनाडू येथे पंतप्रधान ‘क्रिएटिंग द फ्युचर – डिजिटल मोबिलिटी फॉर ऑटोमोटिव्ह एमएसएमई उद्योजक’ कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

२८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:४५ वाजता, पंतप्रधान थुथुकुडी, तामिळनाडू येथे सुमारे १७,३०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. दुपारी साडेचार वाजता, पंतप्रधान यवतमाळ, महाराष्ट्र येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि यवतमाळ (महाराष्ट्र) मध्ये ४९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान पीएम किसान आणि इतर योजनांतर्गत लाभदेखील जारी करतील.

थुथुकुडी येथील सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान व्ही. ओ. चिदंबरनार बंदरातील आऊटर हार्बर कंटेनर टर्मिनलची पायाभरणी करतील. हे कंटेनर टर्मिनल व्ही.ओ. चिदंबरनार बंदराला पूर्व किनारपट्टीसाठी ट्रान्सशिपमेंट हबमध्ये रुपांतरित करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. भारताच्या लांब किनारपट्टीचा आणि अनुकूल भौगोलिक स्थानाचा लाभ घेणे आणि जागतिक व्यापार क्षेत्रात भारताची स्पर्धात्मकता मजबूत करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पामुळे या प्रदेशात रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.

पंतप्रधान व्ही. ओ. चिदंबरनार हे बंदर देशातील पहिले ग्रीन हायड्रोजन हब बंदर बनविण्याच्या उद्देशाने इतर अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करतील. प्रकल्पांमध्ये डिसेलिनेशन प्लांट, हायड्रोजन उत्पादन आणि बंकरिंग सुविधा इत्यादींचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी ग्रीन बोट उपक्रमांतर्गत भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल अंतर्देशीय जलवाहतूक जहाजदेखील लॉन्च करतील. हे जहाज कोचीन शिपयार्डमध्ये तयार करण्यात आले आहे.

स्वच्छ ऊर्जा उपायांचा अवलंब करण्याच्या आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी देशाच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेने हे एक अग्रगण्य पाऊल आहे. याव्यतिरिक्त, पंतप्रधान कार्यक्रमादरम्यान दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील ७५ दीपगृहांमध्ये देशाच्या पर्यटन सुविधांना समर्पित करतील. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी वांची मनियाच्ची-नागरकोइल रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन करतील. रेल्वे मार्गामध्ये वांची मनियाच्ची-तिरुनेलवेली विभाग आणि मेलाप्पलयम – अरल्वायमोली विभागाचा समावेश आहे. सुमारे १,४७७ कोटी रुपये खर्चून विकसित केलेला हा दुहेरीकरण प्रकल्प कन्याकुमारी, नागरकोइल आणि तिरुनेलवेली येथून चेन्नईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचा प्रवास वेळ कमी करण्यात मदत करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here