ऊसदर आंदोलनादरम्यान पोलिसांनी सतर्क राहावे : जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचना

कोल्हापूर : जिल्ह्यात ऊसदर आंदोलन तीव्र होत असून, साखर कारखान्यांकडे जाणारी वाहने पेटविण्याच्या घटना घडत आहेत. ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत अशा घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सतर्क राहावे, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच दिवाळीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रात्रीची गस्त वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

गुन्हे आढावा बैठकीत पोलिसांच्या कामगिरीचा आढावा

ChiniMandi WhatsApp Channel

पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित गुन्हे आढावा बैठकीत नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील पोलिसांच्या कामगिरीचा आढावा घेतला. मागील महिनाभरात नवरात्रोत्सवादरम्यान करण्यात आलेला बंदोबस्त, प्रलंबित गुन्हे आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा यावेळी घेण्यात आला.ऊसदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलनादरम्यान बंदोबस्त वाढविण्याचे निर्देश

यापूर्वी ऊसदर आंदोलनादरम्यान पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले होते. दगडफेकीच्या घटनेत पोलीस अंमलदार मोहन पवार यांना जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वेळीच बंदोबस्त तैनात करावा आणि आंदोलकांना हिंसक प्रकारांपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या.एखादे आंदोलन अचानक सुरू झाल्यास संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने वरिष्ठांना माहिती द्यावी आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करावी, असेही नीलोत्पल यांनी सांगितले.ऊसदर आंदोलन आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here