पुणे : ओझर येथील १३ व्या ऊस परिषदेत एकरी १०० टन उत्पादनाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पुणे : ओझर (ता. जुन्नर) येथे १३ व्या षदेचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना एकरी १०० टनांपेक्षा अधिक उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रेरित ऊस परिकरणे, त्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि ऊस शेतीकडे अधिक नियोजनबद्ध पद्धतीने पाहण्याची दृष्टी निर्माण करणे, हा या परिषदेचा उद्देश होता. परिषदेसाठी महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने पाटील प्रमुख पाहुणे होते. त्यांच्यासह श्यामकांत पाटील, किरण चव्हाण, डॉ. संजीव माने, अनंतराव निकम, महेंद्र घाटगे, सुरेश मुगदुम यांनी मार्गदर्शन केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीत उपयोगी पडणारे मार्गदर्शन देण्यावर भर देण्यात आला. हंगाम सुरुवात, पूर्वहंगामी आणि खोडवा ऊस या तिन्ही प्रकारांमध्ये उत्पादन वाढीसाठी, ऊस पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार खत-पाण्याचे नियोजन कसे करावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करावा, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने पाटील यांनी ऊस हे शेतकऱ्यांना तुलनेने चांगले आणि किमान उत्पन्न मिळवून देणारे महत्त्वाचे नगदी पीक आहे, मात्र, वाढता उत्पादन खर्च आणि विविध आव्हानांचा सामना करताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. शेतीमध्ये नियोजन केल्यास एकरी १०० टन ऊस उत्पादन सहज शक्य असल्याचे डॉ. संजीव माने यांनी सांगितले. श्यामकांत पाटील म्हणाले की, “ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी जमिनीची सुपीकता, योग्य ऊस वाणाची निवड, लागवडीचे नियोजन, बियाणे व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर, पाण्याची योग्य मात्रा आणि पिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक काळजी घेणे महत्त्वाचे असते. ऊस तज्ज्ञ उत्तम जाधव यांनी प्रास्ताविक केले. मनोज बेल्हेकर यांनी सूत्रसंचालन केले, सुनील मोरे यांनी आभार मानले. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अंबादास हांडे, शिवनेर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे, महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष संतोष काळे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here