पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शरद कृषी समृद्धी योजनेतून जादा ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. उपाध्यक्ष नितीनकुमार शेंडे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, संचालक मंडळाचे सदस्य व सभासद उपस्थित होते. कृषी ऊस समृद्धी योजनेअंतर्गत पाच शेतकऱ्यांसह एकरी १०० टनांहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या १९ सभासद शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांना स्मृतीचिन्ह व रोख २५ हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव झाला. शरद ऊस समृद्धी योजनेतील विजेते शशिकांत शिवनारायण सुपेकर, तेजस संजय जगताप, प्रदीप विश्वनाथ जगताप, माधव बाबासो बनकर आणि मंगेश गणपत सोलनकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. उपाध्यक्ष नितीनकुमार शेडे यांनी सांगितले की, माळेगाव कारखान्याचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन घेण्यात नेहमीच आघाडीवर राहतो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यावेळी एकरी १०० टनांचा टप्पा गाठणारे भुजंगराव टेंगले, गोरख तावरे, अभिषेक तावरे, अशोक तावरे, निलेश टेंगले, कृष्णराव टेंगले, नलिनी जगताप, सूर्यकांत बनकर, पिकेश जमदाडे, शशांक जमदाडे, धीरज कोकरे, अरविंद निंबाळकर, मनोहर जगताप, जैनुद्दीन मुजावर, देवीदास गुरव, अरविंद जगताप, सोनाबाई कोकरे, नंदकुमार जगताप आणि वर्षा जगताप यांचा यावेळी गौरव करण्यात आला.


















