पुणे : भीमाशंकर कारखान्याचे सभासदत्व देण्याची द्यावे; साखर आयुक्तांना शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे निवेदन

पुणे : शिरूर तालुक्यातील शेतकरी शिष्टमंडळाने सोमवारी राज्याचे साखर आयुक्तांच्या नावे भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सभाासदत्वाबाबत निवेदन दिले. कारखान्याच्या स्थापनेपासून सलग २७ वर्षे शिरूर तालुक्याच्या ४२ गावांतील शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्याला ऊस दिला आहे. कारखान्याचे उपविधी व इतर तांत्रिक बाबी यासाठी प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे विभाग प्रगती बागल यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले.

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शिष्टमंडळाची हि भेट अतिशय महत्वाची ठरली आहे. याबाबत निवेदनात म्हटले आहे की, या भागातील ऊस उत्पादकांचे भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याशी असलेले नाते विश्वासाचे आहे. या भागातील शेतकऱ्यांनी कारखान्यास सतत गाळपास ऊस दिला आहे. कारखान्याच्या भाग भांडवलासाठी शेअर्स घेतले असल्याची बाब शेतकरी शिष्टमंडळाने आयुक्तांच्या लक्षात आणून दिल्या. कारखान्याचे सभासदत्व देण्याची मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी शेतकरी संघटना अध्यक्ष ज्ञानेश्वर ढोमे, नरेश ढोमे, रमेश वरे, अविनाश पोकळे, राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन थोरात इत्यादी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel

—

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here