पुणे : पुरंदर कृषी एक्स्पोमध्ये ऊस पिकातील एआय तंत्राबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

पुणे: सासवडच्या ‘पुरंदर कृषी एक्स्पो २०२६’ मध्ये ‘एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून ऊस शेती’ या विषयावर बारामती कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे मार्गदर्शन यांनी केले. पुरंदरमधील शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धत बदलून या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. केवळ ऊस याच पिकाला शाश्वत बाजारपेठ असल्याने योग्य नियोजनाद्वारे तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास कमी पाण्यात आणि कमी खर्चात एकरी सव्वाशे ते दीडशे टनाचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांना शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, संयोजक प्रदीप पोमण, प्रकाश पवार, संभाजी गरूड, विलास जगताप, नंदकुमार जगताप, संदीप फडतरे यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

डॉ. विवेक भोईटे म्हणाले की, शेतकऱ्यांपुढे सध्या अनेक अडचणी असल्या तरी ‘एआय’ तंत्रज्ञान त्यावर पर्याय आहे. एआय प्रणालीद्वारे हवेतील व जमिनीतील तापमान, आद्रता कळते. जमिनीच्या प्रकारानुसार लागवडीचे अंतर ठरवता येते. नऊ महिन्यांच्या उसाची किंवा शक्यतो रोपांची लागवड करताना सुरुवातीचा बेसल डोस आणि पुढील विद्राव्य खतांचे नियोजन एआय ठरवते. माती परीक्षण करून ऊस तुटेपर्यंत नेमके किती आणि कधी पाणी, खते द्यायचे याचे तंतोतंत नियोजन करण्यासोबतच, पिकावर रोग किंवा कीड येण्यापूर्वीच एआय तंत्रज्ञान पूर्वकल्पना देते. त्यामुळे वेळेत औषध फवारणी करून शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान टाळता येते. यावेळी डॉ. भोईटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here