पुणे : माळेगाव कारखान्याच्या ६२ ऊसतोड कामगारांना ४८ लाखांचा विमा दिलासा; मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत

पुणे : कै. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या विमा योजनेअंतर्गत माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील तब्बल ६२ ऊसतोड कामगार व बैलगाडी मालकांना सुमारे ४८ लाख रुपयांच्या विमा दाव्यांचा लाभ मंजूर झाला आहे, अशी माहिती प्रभारी कार्यकारी संचालक श्रीकांत पाटील यांनी ही माहिती दिली.ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूकदार हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या श्रमांमुळेच कारखाना सातत्याने प्रगतीची नवी शिखरे गाठत असून, त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ओळखून कारखाना प्रशासनाने विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यातून ६२ लाभार्थ्यांना सुमारे ४८ लाख रुपयांच्या विमा दाव्यांचा लाभ मंजूर झाला आहे.

या लाभार्थ्यांमध्ये कामावर असताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या तीन ऊसतोड कामगारांच्या कुटुंबीयांचाही समावेश असून, प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी पाच लाख रुपयांची विमा मदत मंजूर करण्यात आली आहे. या आर्थिक सहाय्यामुळे संकटग्रस्त कुटुंबांना मोठा आधार मिळणार असल्याचे सांगण्यात आले. माळेगाव कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय अजित पवार यांच्या दूरदूदृष्टीतून सुरू झालेल्या कामगार कल्याणाच्या धोरणाला विद्यमान अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विशेष पाठपुराव्याची जोड मिळाल्याने हा महत्त्वाचा लाभ पात्र कामगारांपर्यंत पोहोचू शकला, अशी माहिती उपाध्यक्ष सौ.संगीता कोकरे व संचालक नितीन सातव यांनी दिली.कामगार हिताला प्राधान्य देणाऱ्या या निर्णयाबद्दल ऊसतोड कामगार, ऊस वाहतूकदार तसेच त्यांच्या विविध संघटनांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले आहेत, असे ऊस वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here