पुणे : माळेगाव कारखाना यंदा १३ लाख टन ऊस गाळप करणार, बॉयलर अग्निप्रदीपनप्रसंगी घोषणा

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यापूर्वीचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष नितीन शेंडे व कविता शेंडे यांच्या हस्ते झाला. कारखान्याने गतवर्षी सभासदांच्या उसाला ३६५० रुपये प्रतिटन अंतिम दर दिला आहे. उपमुख्यमंत्री तथा कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादकांना चांगला दर देण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी कारखान्याला आगामी हंगामात गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी गळीत हंगामात कारखान्याने १३ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी सुमारे सात लाख टन ऊस सभासदांकडून उपलब्ध होण्याची शक्यता असून, उर्वरित सहा लाख टन गेटकेन ऊस आणावा लागेल अशी माहिती उपाध्यक्ष शेंडे यांनी दिली.

उपाघ्यक्ष शेंडे यांनी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे घटत चाललेले उसाचे एकरी टनेज आणि कारखान्यापुढील आर्थिक अडचणी लक्षात घेता, त्यामुळे अधिकाधिक गेटकेन ऊस उपलब्ध करून गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर द्यावा लागणार आहे, असे स्पष्ट केले. बॉयलर अग्निप्रदीपन समाारंभानंतर त्यांनी सभासदांशी संवाद साधला. सुरेश देवकाते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिवराज जाधवराव यांनी आभार मानले. माजी अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल, दूध संघाचे अध्यक्ष किशोर फडतरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, संगिता कोकरे, तानाजी कोकरे, योगेश जगताप, प्रताप आटोळे, स्वप्नील जगताप, विजय तावरे, शिवराज जाधवराव, चंद्रशेखर जगताप, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here