पुणे : सोमेश्वर कारखान्याचा शेतकरी संवाद, ‘एआय’पासून ठिबक सिंचनापर्यंत सर्व विषयांवर मार्गदर्शन

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने कार्यक्षेत्रात सभासद संवाद दौरा सुरू करण्यात आला आहे. कारखाान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या दौऱ्यात सभासदांच्या अडचणी जाणून घेत ऊस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन केले जात आहे. चार तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात पुरंदर, खंडाळा आणि फलटण-पाडेगाव भागातील दौरे यशस्वीपणे पूर्ण झाले आहेत. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक, कोऱ्हाळे खुर्द, लाटे, माळवाडी, बजरंगवाडी, थोपटेवाडी, वडगाव निंबाळकर, होळ, सदोबाची वाडी, सस्तेवाडी आणि सोरटेवाडी येथे दौरे पार पडले. नुकतेच करंजे, करंजेपूल, चौधरवाडी, वाकी, चोपडज आणि मगरवाडी येथे सभासदांशी संवाद साधण्यात आला.

या दौऱ्यात अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यासह उपाध्यक्ष किसन तांबे, ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, मिलिंद कांबळे, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे आणि जितेंद्र निगडे सहभागी झाले होते. अधिकारी बापूराव गायकवाड आणि विराज निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन करत मार्गदर्शन केले. सभासदांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित शेती, कीड व रोग व्यवस्थापन, योग्य औषधोपचार, ठिबक सिंचन, विविध शासकीय अनुदान योजना तसेच ऊस उत्पादन वाढीसाठी आवश्यक आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. या दौऱ्याचा मुख्य उद्देश सभासद शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे, ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि कारखाना-सभासद-शेतकरी नाते अधिक दृढ करणे हा आहे असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी ऊस बाहेर न घालता सोमेश्वरलाच द्यावा असे आवाहन सभासदांना करण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here