पुणे : व्यंकटेशकृपा शुगरचे ‘व्हीएसआय’च्या मार्गदर्शनाखाली ऊस लागवड धोरण, हंगामनिहाय वाणांची शिफारस

पुणे : जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२६-२०२७ आणि त्यापुढील वर्षासाठी ऊस लागवड धोरण जाहीर केले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मार्गदर्शनाखाली हे धोरण निश्चित करण्यात आले आहे. यानुसार लागवडीसाठी आडसाली हंगामात १ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत को एम ०२६५, को ८६०३२, फुले ऊस १३००७, फुले ऊस १४०१२, फुले ऊस १५००६ या वाणांची शिफारस करण्यात आली आहे. पूर्व हंगामी लागवडीमध्ये १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत को एम ०२६५, को ८६०३२, को व्हीएसआय १८१२१, फुले ऊस १५००६, फुले ऊस १४०१२ या वाणांची शिफारस केली आहे. तर सुरू हंगामाचत १ डिसेंबर ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत कोएम ०२६५, को ८६०३२, को व्हीएसआय १८१२१, फुले ऊस १३००७, फुले ऊस १५००६, फुले ऊस १४०१२, एमएस १०००१ या वाणांची शिफारस केली आहे.

कारखान्याने परिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कारखान्यामार्फत मान्यताप्राप्त नर्सरींमधून दर्जेदार ऊस रोपे रास्त दरात रोखीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यांत्रिक पद्धतीने ऊस तोडणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी दोन सरींमधील अंतर ५ फूट ठेवावे, लागवडीसाठी ९ ते १० महिन्यांचे शुद्ध बेणे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ऊस रोपांची लागवड ५ बाय १.५ फूट अंतरावर करावी. त्यामुळे ऊस बेणे, तोडणी, वाहतूक, पाणी व तणनाशक खर्चात मोठी बचत होऊ शकते. शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. गळीत हंगामाच्या अखेरपर्यंत तुटलेल्या उसाचा खोडवा राखण्याचेही आवाहन कारखान्याने केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here