सांगली जिल्ह्यात कोल्हापूरप्रमाणेच ऊस दर देण्याची राजू शेट्टींची मागणी, आंदोलनाचा इशारा

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीने ऊस दराचे सूत्र ठरले आहे, तशाच पद्धतीने सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील साखर कारखानदारांनी ऊस दर द्यावा. जर कारखान्यांनी लवकर भूमिका स्पष्ट केली नाही, तर ऐन दिवाळीत आंदोलन करत कारखाने बंद करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. येथे शुक्रवारी ६) आयोजि पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सांगलीतील कारखानदार, जिल्हाधिकारी, खासदार विशाल पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत दराबाबत चर्चा झाली, तेव्हा ‘कोल्हापूर पॅटर्न’ आपण अंमलात आणू, असा त्या चर्चेतून निर्णय घेण्यात आला. मात्र ‘कोल्हापूर पॅटर्न’ ठरला नव्हता. आता कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराचा पॅटर्न ठरला आहे. त्याची कार्यवाही करण्याची मागणी आहे.

शेट्टी म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच सांगली आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार दराचा फॉर्म्यूला ठरवतात. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये, ६५-७० साखर कारखान्यांचा एकच पॅटर्न आता ठरलेला आहे. त्यामुळे सांगलीतील साखर कारखानदारांनी याच पॅटर्ननुसार भूमिका लवकर स्पष्ट करावी. आम्ही ६२ तास ‘रास्ता रोको’ आंदोलन केल्यानंतर दराचा पॅटर्न ठरला आहे. जिल्ह्यातील सर्व कारखानदारांशी मंत्री हसन मुश्रीफ यांनी चर्चा करत यास मान्यता दिली. वास्तविक पाहता, कोल्हापूरचा पॅटर्न प्रमाणे सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांची भूमिका होती. आता सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी निर्णय न घेतल्यास कारखान्यांवर जावून काटा बंद करू. यावेळी संदीप राजोबा यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here