रशिया: साखरेचे किरकोळ दर कमी करण्यासाठी करार

मास्को : रशिया सरकारने मंगळवारी स्थानिक साखर आणि सूर्यफुल तेल उत्पादकांसोबत किरकोळ श्रेणीतील आपल्या्या उत्पादांची किंमत कमी करण्यासाठी करार केला असल्याचे जाहीर केले. सद्यस्थितीत असलेला करार मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत होता. त्यामध्ये साखरेच्या दरासाठी जून अखेरपर्यंत आणि सूर्यफुल तेलासाठी ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

अलीकडेच रशियन सरकारने १५ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ३,५०,००० टन कच्ची साखर आयात करण्यासाठी आयात कर हटविला जाऊ शकतो असे सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here