सांगली : महांकाली साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ५४ टक्के मतदान, निकाल बुधवारी

सांगली : महांकाली साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ५४ टक्के शांततेत मतदान झाले. सकाळपासूनच संथ गतीने सुरू असलेले मतदान दुपारनंतर वेगाने पुढे सरकले. निवडणुकीत सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीचा निकाल बुधवारी (ता. ९) सकाळी आठपासून लोकशाहीर राजा पाटील नाट्यगृहात पार पडणार आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील आठ ठिकाणी ३२ मतदान केंद्रे आणि कर्नाटकातील अथणी तालुक्यातील अनंतपूर येथील पाच केंद्रांवर रविवारी (ता. ६) मतदान प्रक्रिया पार पडली. महांकाली कारखान्याच्या १७ जागांसाठी ३७उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी काही मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. प्रांताधिकारी विशाल यादव यांच्या उपस्थितीत निवडणूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. महांकाली कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सभासदांनी रांगा लावत मतदानाचा हक्क बजावला. सर्वच केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. महांकाली कारखान्याच्या १७ जागांसाठी ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीत महांकाली शेतकरी विकास पॅनेल आणि महांकाली साखर कारखाना बचाव समिती यांच्यात थेट सामना रंगला होता.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here