सांगली : गेल्या हंगामातील उसाला ३,८५० रुपये अंतिम दर देण्याची शेतकरी संघटनेची मागणी

सांगली : शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी संघटनेच्या कार्यालयात बैठक झाली. प्रारंभी प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गेल्या हंगामातील उसाला प्रतिटन ३,८५० रुपये अंतिम दर देण्याची मागणी करण्यात आली. याप्रश्नी सर्व कारखान्यांना लेखी निवेदन देण्याचा निर्णय शेतकरी संघटनेच्या बैठकीत झाला. बैठकीत शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी वसंत भिसे, बाशेखान मुजावर, किरण मगदूम, शंकर कापसे, बाबा पाटणे, नवनाथ पोळ, ईश्वर कणसे, सचिन गवळी, एकनाथ कापसे, किशोर मगदूम, मोहन परमाणे, प्रशांत मालगावे, चारू बिरनाळे उपस्थित होते.

बैठकीत उपस्थित शेतकरी नेत्यांनी सांगितले की, सध्या इथेनॉलसह साखरेला चांगला दर मिळत असल्याने दक्षिण महाराष्ट्रातील अधिक रिकव्हरी असलेल्या कारखान्यांना गुजरातच्या धर्तीवर दर देणे शक्य आहे. सहकार आघाडीचे नेते संजय कोले म्हणाले की, गेल्या हंगामात दिलेल्या उसाला प्रतिटन ३,८५० रुपयांप्रमाणे अंतिम दर मिळायला हवा. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना गुजरातप्रमाणे दर देणे शक्य आहे. सातारा येथील बाळासाहेब चव्हाण यांनी इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना ऊस दर मिळण्यास मदत होत आहे असे सांगितले. तर संजय गायकवाड म्हणाले, “सरकारने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवेळी निम्म्या दराने पाणीपट्टी, घरपट्टी वसूल घेतली. त्यावेळी ऊस बिले सोयाबीन, कांदा, ज्वारी, बाजरीची विक्री न झालेल्यांना सवलतीचा फायदा घेता आला नाही. शीतल राजोबा, बळासाहेब पाटील, रामचंद्र कणसे, वसंत कदम यांनी सांगली कृषी बाजार समिती, वसंतदादा साखर कारखाना, शक्तिपीठ महामार्ग हे विषय मांडले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here