सांगली : गौरव नायकवडी यांनी घेतली संचालक मंडळाची बैठक, तपशील जाहीर करण्यास नकार

सांगली: गेल्या महिनाभरापासून हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांचा राजीनामा व गैरकारभाराबाबत सुरू असलेल्या आंदोलनाचे प्रमुख नेते गौरव नायकवडी यांनी कारखान्याच्या संचालक मंडळांची बैठक घेतली. मात्र, त्यातील तपशील जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. आंदोलकांसमोर बोलताना ते म्हणाले की, गेल्या २० वर्षांपासून वैभव नायकवडी यांनी उद्योग समूहातील सर्व संस्थांचा कारभार केला आहे. त्याची कटू फळे सभासद, शेतकरी भोगत आहेत. कोट्यवधी रुपयांची लूट करताना त्यांनी कशाचीही फिकीर केली नाही. एवढे करूनही ते पद सोडण्याचे धाडस करत नाहीत. आम्ही कायदेशीर मार्गाने त्यांना बाजूला करू.

गौरव नायकवडी म्हणाले की, “हुतात्मा उद्योग समूहातील सर्व संस्थांच्या पदांवरून वैभव नायकवडी यांना पायउतार व्हावे लागेल. आतापर्यंत वैभव नायकवडी यांनी केवळ कारखान्याचे अध्यक्षपद सोडावे, अशी मागणी होती. मात्र, आता हुतात्मा उद्योग समूहातील सगळ्या संस्थांच्या कामकाजातून बाजूला व्हावे. सभासद, शेतकरी या संस्था अधिक कार्यक्षमपणे सांभाळतील. सगळे सभासद या संस्था सांभाळण्यासाठी सक्षम आहेत. तुमच्या नसण्याने काहीही फरक पडणार नाही. यावेळी किरण नायकवडी, केदार नायकवडी, पोपट अहिर, वसंत वाजे, अरुण यादव, संचालक, सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here