सांगली : हुतात्मा कारखान्यातर्फे ऊस तोडणी कमिशनचे २६ कोटी रुपये जमा – गौरव नायकवडी यांची माहिती

सांगली : चालू गळीत हंगामात हुतात्मा साखर कारखाना क्रांतिवीर नागनाथअण्णांना अभिप्रेत असा नवा इतिहास निर्माण करेल. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जमंजुरीला वैभवकाका नायकवडी यांनी अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे कोल्हापूर येथील हुतात्मा बँकेच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यांनी सकाळी संमतीपत्र देण्याचे मान्य केले आणि त्यानुसार ते दिले. त्यानंतर केडीसी बँकेने तातडीने ३० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. आता ऊस तोडणी, वाहतूक कमिशन व डिपॉझिटचे तब्बल २६ कोटी रुपये संबंधितांच्या खात्यावर आज जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती गौरव नायकवडी यांनी दिली. वाळवा येथे ते बोलत होते.

हुतात्मा साखर कारखान्यासमोर किरण नायकवडी, गौरव नायकवडी व केदार नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २६ दिवसांपासून सभासद शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. वैभव नायकवडी यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा तसेच कारखान्यावर झालेले कर्ज फेडावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी किरण नायकवडी, केदार नायकवडी, प्रताप शिंदे, दादा चव्हाण, पोपट अहिर, बाळासाहेब पाटील, वसंत वाजे आणि अरुण यादव यांचीही भाषणे झाली. आंदोलनस्थळी ‘चेअरमन हटाव, हुतात्मा बचाव’, तसेच ‘वैभव हटाव, हुतात्मा बचाव’ अशा घोषणा देण्यात आल्या.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here