सांगली : हुतात्मा कारखाना यंदा ६ लाख टन ऊस गाळप करणार

सांगली : हुतात्मा सहकारी साखर कारखान्याने चालू २०२६-२७ गळीत हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी कारखाना कार्यक्षेत्रासह कार्यक्षेत्राबाहेरील १९ हजार ६०० एकर क्षेत्रावरील उसाची नोंदणी झाली आहे. कारखान्याने गेल्या गळीत हंगामात ४,७३,४६३ टन उसाचे गाळप करून सरासरी १२.५५ टक्के साखर उतारा मिळवला होता. यावर्षीचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यक्षेत्रातील ७ हजार ७०० एकर, तर कार्यक्षेत्राबाहेरील ११ हजार ९०० एकर क्षेत्रावरील उसाची नोंदणी झाली आहे. ऊसतोडणीसाठी सहा हार्वेस्टर मशीन, बैलगाडी, अंगद, ट्रॅक्टरमार्फत प्रतिदिन सहा हजार टन ऊस गाळपास आणण्याचे नियोजन आहे, अशी माहिती कारखान्याच्या सूत्रांनी दिली.

हुतात्मा कारखान्याचे कार्यक्षेत्र अवघ्या १५ गावांचे आहे. कार्यक्षेत्र छोटे असले, तरी कारखान्याने देशाच्या सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. गेल्यावर्षी कारखान्याने प्रतिटन ३,५०० रुपये दर दिला. आजच्या स्पर्धात्मक परिस्थितीत मात्र कारखाना आजही सुमारे चाळीस वर्षांपूर्वीची जुनी यंत्रसामग्री आणि नव्या-जुन्या तंत्रज्ञानाच्या आधारे वाटचाल करत आहे. याबाबत कारखान्याचे कार्यकाारी संचालक शिवाजी पाटील यांनी सांगितले की, कारखान्याची मशिनरी जुनी झाली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

सध्याच्या साखर कारखान्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी कारखान्याला आधुनिकीकरण, क्षमतावाढ करण्याची गरज आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याने ऊस वजनात घट दिसून येत आहे. याचा परिणाम साखर उतारा कमी होऊन कारखान्याचे आर्थिक उत्पन्न कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीसुद्धा जास्तीत जास्त साखर उतारा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तर कारखान्याच्या अध्यक्षा जयश्री अहिर यांनी सभासद, शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस हुतात्मा कारखान्याकडे पाठवावा असे आवाहन केले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here