सांगली : कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक कराराचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्ष शरद लाड म्हणाले की, वाहनधारक व ऊसतोड मजुरांच्या हितासाठी कारखाना प्रशासन नेहमीच पुढाकार घेत आहे. शासनाने तीन वर्षांपूर्वी ऊस तोडणी मजुरी दरात ३४ टक्के वाढ केल्यानंतर कारखान्याने राज्यात पहिल्यांदाच वाहतूकदारांना १५ टक्के आणि तोडणी मजुरांना ३५ टक्के वाढ लागू केली होती. तसेच गतवर्षीही वाहतूक दरात १० टक्के वाढ देण्यात आली होती.
यंदाही मागील हंगामाप्रमाणे लवकर करार प्रक्रिया पूर्ण करून ॲडव्हान्स देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. टोळी मुकादमांकडे अडकलेल्या रकमेबाबत कारखाना प्रशासन मदत करेल. क्या वित्तीय धोखाधड़ी में आपके पैसे डूब गए? अपनी शिकायत सचेत पोर्टल पर दर्ज करें। आगामी गळीत हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व वाहतूकदारांनी सक्षम मजूर टोळ्या तयार कराव्यात, जेणेकरून ऊस वेळेत व जास्तीत जास्त प्रमाणात कारखान्याकडे पोहोचवता येईल. तसेच कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करूनच मजूर टोळ्यांशी व्यवहार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, महादेव पवार, किरण गावडे, विकास काळे, अविनाश सूर्यवंशी, विकास पवार, मल्हारी जाधव, विक्रम पवार, अंकुश मदने, विजय यादव, आप्पासो जंगम आणि मीनानाथ अभंग या वाहतूकदारांशी प्रतिनिधिक स्वरूपात करार करण्यात आले.कार्यक्रमाला संचालक जयप्रकाश साळुंखे, सुकुमार पाटील, विजय पाटील, तात्यासाहेब वडेर, दिलीप थोरबोले, अशोक विभुते तसेच शेती अधिकारी दिलीप पार्लेकर यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















