सांगली : क्रांती कारखान्याकडून १०० रुपयांचा अंतिम हप्ता अदा – अध्यक्ष शरद लाड

सांगली : येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ च्या गळीत कारखान्याने गेल्यावर्षीच्या गळीत हंगामात, सन २०२५-२६ मध्ये ९ लाख ५२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. या हंगामासाठी प्रतिटन ३,३६८ रुपये रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) निश्चित झाला होता. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत कारखाना व्यवस्थापनाने एफआरपीपेक्षा प्रतिटन १३२ रुपये अधिक देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रतिटन ३,५०० रुपये अंतिम ऊसदर जाहीर करण्यात आला होता. यापैकी शिल्लक असलेला प्रतिटन १०० रुपयांचा अंतिम हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी ही माहिती दिली.

कारखाना प्रशासनाने सांगितले की, क्रांती कारखान्याने २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसासाठी जाहीर दरापैकी आतापर्यंत प्रतिटन ३,४०० रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. आता उर्वरित १०० रुपयांचा हप्ता दिवाळीपूर्वी जमा केला जाणार आहे. यासाठी एकूण किंमत १२ कोटी ५७ लाख रुपये वितरीत करणार असल्याचे कारखान्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना हंगामातील ऊसदराची संपूर्ण रक्कम मिळणार असून, सणासुदीच्या काळात त्यांना आर्थिक हातभार लागेल. कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे, असे अध्यक्ष लाड म्हणाले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here