सांगली : नांगोळेत महाकाली साखर कारखाना बचाव कृती समितीची बैठक, एकजुटीचे सभासदांना आवाहन

कवठेमहांकाळ : तालुक्यातील नांगोळे येथे महांकाली साखर कारखाना बचाव कृती समितीची बैठक झाली. यावेळी ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे, समितीचे संदीप गिड्डे-पाटील यांसह प्रमुख नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. महाकाली साखर कारखाना ही तालुक्याची जीवनवाहिनी आहे. ती बंद पडल्याने शहरातील बाजारपेठ ओस पडली आहे. ऊसतोड मजूर, कामगार, वाहतूकदार सगळ्यांचे नुकसान झाले आहे. आता मागे न पाहता महांकाली कारखाना वाचविण्यासाठी ताकदीने कामाला लागू,” असे आवाहन ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे यांनी केले. यावेळी समाजकल्याण सभापती दादासाहेब कोळेकर, जिल्हा परिषद सदस्य संजय बनसोडे, विकास हाक्के, मिलिंद कोरे, माजी सभापती गजानन कोठावळे, पंचायत समितीचे उपसभापती वामन कदम, सदस्य प्रा. अर्जुन कर्पे, दिलीप झुरे प्रमुख उपस्थित होते.

शेंडगे यांनी मी महांकाली कारखाना वाचविण्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका ठेवली. पण तेव्हा पाठबळ मिळाले नाही. परिणामी कारखाना बंद पडला. आता तसे होऊ देऊ नका असे आवाहन केले. यावेळी समितीचे संदीप गिड्डे-पाटील म्हणाले की, कारखाना बंद पडल्यामुळे तालुक्याच्या अर्थचक्रावर मोठा परिणाम झाला आहे. कोणत्याही राजकीय मतभेदांना बाजूला ठेवून कारखाना पुन्हा उभारण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. हा कारखाना म्हणजे केवळ एक उद्योग नाही तर हजारो शेतकरी, कामगार, वाहतूकदार व व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाहाशी निगडित संस्था आहे हे लक्षात घ्यायला हवे. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती महेश पवार, नेताजी पाटील, प्रा. दादासाहेब ढेरे, अविराजे शिंदे, आप्पासाहेब कोळेकर, तुकाराम पाटील, आप्पासाहेब सगरे, रणजित घाडगे, विक्रम कोळेकर, विशाल गिड्डे उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here