सांगली : मोहनराव शिंदे कारखान्यामध्ये मिल रोलर पूजन, यंदा पाच लाख टन ऊस गाळपाची तयारी

सांगली : “मोहनराव शिंदे साखर कारखान्यामध्ये आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक व उद्योजक किरण गोविंदराव पाटील यांच्या हस्ते आणि कारखान्याचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिल रोलरचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे किरण पाटील यांचा संचालक वसंत मगदूम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कारखान्याने आगामी गळीत हंगामासाठी ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी यंत्रसामग्रीच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे,” अशी माहिती अध्यक्ष डॉ. मनोज शिंदे-म्हैसाळकर यांनी दिली.

यावेळी अध्यक्ष मनोज शिंदे म्हणाले, “कार्यक्षेत्रातील सर्व ऊस तोडणी व वाहतूकदारांनी मोठ्या प्रमाणात करार करावेत. तसेच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी परिपक्व ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे. गाळप हंगाम सुरळीत पार पडावा, यासाठी सर्व यंत्रसामग्रीची देखभाल-दुरुस्ती वेगाने सुरू आहे. ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदारांशी करार करण्याची, तसेच त्यांना उचल रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कार्यक्रमास आरग सोसायटीचे अध्यक्ष सुरेश माळी, पंचायत समिती सदस्य विनोद गायकवाड, जयपाल कांबळे, संचालक पांडुरंग माने, सुरेश कुंभार, मोहन शिंदे, मुख्य अभियंता रमेश चव्हाण, मुख्य रसायनी तज्ज्ञ संजय जाधव, मुख्य लेखाधिकारी सुरेश यादव, मुख्य शेती अधिकारी परशुराम चव्हाण आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here