सांगली : भिलवडी येथील संग्राम केन ॲग्रोचे अध्यक्ष नीलेश येसुगडे यांच्या हस्ते ऊस तोडणी व वाहतूक कराराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी संचालक उमेश पाटील, अरुण ब्रम्हे, अशोक पवार तसेच एमडी रंगराव बबनराव येसुगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कंत्राटदारांशी करार करण्यात आले. करार प्रक्रियेला भिलवडी, पलूस व सांगली परिसरातील कंत्राटदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोहळ्यानंतर वाहनांचे पूजन करण्यात आले.
संग्राम केन ॲग्रोने आगामी गळीत हंगामासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. कारखान्याचे एमडी बबनराव येसुगडे यांनी, आगामी गाळप हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक व्यवस्थेचे नियोजन पूर्ण झाल्याचे सांगितले. यंदा कारखान्याने वेळेत करार केल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्यापर्यंत पोहोचेल व त्यांचे नुकसान टळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी कपिल गायकवाड, योगेश रसाळ, बाळासाहेब कुंभार, महेश मोकाशी, संजय पाटील, नागेश येसुगडे, सौरभ भोरे उपस्थित होते.


















