सांगली : श्रीपती शुगर अँड पॉवर (डफळापूर- कुडणूर) येथे कार्यकारी संचालक महेंद्र लाड यांच्या हस्ते मिल रोलर पूजन झाले. लाड म्हणाले, “२०२६-२७ गळीत हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी सुरू केली आहे. गतवर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे प्रतिकूल परिस्थितीतही चांगले गाळप केले आहे. चालू गळीत हंगामामध्ये कारखान्याचे विस्तारीकरण करून प्रतिदिन ५ हजार टन गाळप होणार आहे. सध्या मशिनरी जोडणीचे काम प्रगतिपथावर आहे.
त्यामुळे यंदा ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून कार्यक्षेत्रातील उत्पादकांच्या उसाच्या नोंदी घेण्याचे काम शेती विभागामार्फत सुरू असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाच्या नोंदी कारखान्याच्या शेती विभागाकडे कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.सरव्यवस्थापक महेश जोशी, चिफ इंजिनिअर यशवंत जाधव, चिफ केमिस्ट दीपक वाणी, एच. आर. मॅनेजर रणजित जाधव, आनंदा कदम, संभाजी शेवाळे, प्रवीण कौलापूर, माणिक पाटील उपस्थित होते.


















