सांगली : सोनहिरा कारखाना वार्षिक सभेत करणार सर्वाधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान

सांगली : पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या शनिवारी (ता.१९) दुपारी १.३० वाजता अध्यक्ष माजी आमदार मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ‘लोकतीर्थ’ या डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारकस्थळावरील हॉलमध्ये संचालक व आमदार विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा होईल, अशी माहिती कार्यकारी संचालक एस. एल. देसाई यांनी दिली. आडसाली, पूर्वहंगामी आणि खोडवा उसामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती देताना कार्यकारी संचालक देसाई म्हणाले की, आगामी गळीत हंगाम पार पाडण्यासाठी सर्व तयारी झाली आहे. २५०० टन प्रतिदिन गाळप क्षमतेने सुरू झालेला साखर कारखाना ९५०० टन प्रतिदिन क्षमतेने गाळप करीत आहे. शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले. डॉ. पतंगराव कदम यांनी प्रतिकूल, दुष्काळी परिस्थितीत सामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून उभारणी केली. कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम व संचालक आमदार विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने उत्तम प्रगती केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here