सांगली : सोनहिरा साखर कारखान्याचे १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट – अध्यक्ष मोहनराव कदम

सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचेमध्ये सन २०२६-२७च्या गळीत हंगामासाठी कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे संचालक रघुनाथराव कदम यांच्या हस्ते मिल रोलर पूजन करण्यात झाले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी शिंदे, कार्यकारी संचालक शरद कदम आदी उपस्थित होते. कारखान्याने आगामी गळीत हंगाम, सन २०२६-२७ मध्ये १४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ ठेवले आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष तथा माजी आमदार मोहनराव कदम यांनी केले.

अध्यक्ष कदम म्हणाले की, ऊस तोडणीसाठी ३५० चार चाकी वाहने, एक हजार अंगद गाडी, ३५० बैलगाडी व १५ हार्वेस्टिंग मशीन सज्ज आहेत. तरी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी गळितास आपला ऊस कारखान्यास पाठवावा. कारखान्याच्या अंतर्गत सर्व यंत्रसामग्री वेळेत जोडणी करून कारखाना ऑक्टोबर पूर्वी गळितासाठी सज्ज करण्यात येणार आहे. कारखान्याच्या सर्वच विभागांतील कर्मचारी व अधिकारी यांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे कारखान्याची प्रगती झाली आहे. यावेळी संचालक बापूसो पाटील, पी. सी. जाधव, पोपटराव महिंद, दिलीपराव सूर्यवंशी, पंढरीनाथ घाडगे, युवराज कदम, जगन्नाथ माळी, शिवाजी गढळे, शिवाजी काळेबाग, संभाजी जगताप आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here