सांगली : साखरेची पन्नाशी तर गुळाची साठी, मागणीमुळे दरवाढीचा ट्रेंड कायम

सांगली : आधी साखरेच्या दराने प्रति किलो पन्नाशी ओलांडली, तर गुळाने प्रति किलो ६० रुपयांवर मजल मारली आहे. गूळ दरात यंदा पाच वर्षातील मोठी दरवाढ दरवाढ झाली आहे. गुळ किलोमागे १० रुपयांची, तर क्विंटलमागे १,००० रूपये महागला आहे. आगामी काळातील श्रावण महिना, रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाल्याचे म्हटले जाते. दरवर्षी नागपंचमीला चिक्की गुळाची खरेदी अधिक होते. गुळाची मागणी रथसप्तमीपर्यंत अधिक असते. चिक्कीसाठीच्या गुळाची मागणीही दुपटीने वाढली आहे.

रक्षाबंधन आणि गणेशोत्सवात गुळाला अधिक पसंती दिली जाते. यंदा गूळ पावडरची मागणीही वाढली आहे. यंदा गणपतीपर्यंत दरात आणखी ५ ते १० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या सांगलीत एक नंबर दर्जाचा गूळ दाखल झाला आहे. सर्व नॉर्मसमध्ये पास होणारा गूळ सणासाठी उपलब्ध आहे. दिवसेंदिवस गुळाची आवक वाढत आहे, असे सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई यंनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel

सांगली बाजारपेठेत गुळाची उलाढाल वर्षभर सुरू असते. येथे कर्नाटकातील रायबाग तालुक्यातून २० टक्के गूळ येतो. तेथून सध्या सांगली मार्केटमध्ये व रोज १०० टन गुळाची आवक होते. गुळ व्यापारी आदर्श हुक्केरी यांनी सांगितले की, एक, अर्धा आणि पाव किलोची ढेप, १० किलोच्या भेली आणि ३० किलोचे रवे अशा स्वरूपात गूळ येतो. ग्राहक पाव किलो, अर्धा किलो, १ किलो गुळाच्या ढेपा अधिक मागवतात.

यावेळी बाजारपेठेत रंग, रसायनविरहित शुध्द पिवळा गूळ आणि सेंद्रिय गूळ या दोघांचीच चलती आहे. केसरी रंग मिसळलेला, आरोग्यास अपायकारक असा गूळ बाजारात दिसत नाही. सध्या कर्नाटकात पाऊस वाढल्यामुळे वाहतुकीस अडथळे येत आहेत आणि हवेतील आर्द्रतेमुळे गुळाच्या साठवणुकीतही अडचणी येतात. पाऊस सलग सुरू राहिला, तर गूळ निर्मिती आणि साठवणुकीवर परिणाम होतो. गूळ निर्मिती कमी झाली, तर आवक घटते आणि दरवाढ अटळ ठरते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. मागणीत सातत्य असल्याने गुळ पावडरच्या दरातही वाढ झाली आहे. गूळ पावडर गेल्यावर्षी ३८ रुपये किलो होती. ती यंदा ५५ ते ६० रुपये किलो आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here