सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा, बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात

सातारा : शेंद्रे येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात, मोठ्या उत्साहात झाली. यावेळी कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आणि गव्हाणीत ऊस मोळी टाकून कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ जेष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी मार्गदर्शन केले. कार्यकारी संचालक मोहिते यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले. सभासदांनी हात वर करून एकमताने सर्व विषयांना मंजुरी दिली. यावेळी विक्रमी उत्पादन घेणाऱ्या तसेच कारखान्याला विक्रमी ऊस पुरवठा करणाऱ्या विविध गावातील शेतकऱ्यांचा रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, सभासद, शेतकरी आणि कामगार यांच्या अनमोल सहकार्यामुळेच कारखाना प्रगतीपथावर पोहचला आहे. नेहमीप्रमाणे आगामी गळीत हंगामातही आपला सर्वच्या सर्व ऊस अजिंक्यतारा कारखान्याला घालून आपले सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सर्व आजी, माजी चालक, लालासाहेब पवार, जि. प.चे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, किरण साबळे पाटील, वनिता गोरे, विद्यमान सदस्य अजित साळुंखे, पूजा मोरे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश सावंत, कांचन साळुंखे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. व्हा. चेअरमन सावंत यांनी स्वागत केले. संचालक नितीन पाटील यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here