सातारा : जिल्ह्यातील ऊस तोडणी, वाहतुकीचा प्रती टन सरासरी १,००० रुपये खर्च

सातारा : गेल्या काही वर्षात महागाई वाढल्याने उस तोडणी, वाहतुकीच्या खर्चात साखर कारखान्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा प्रति टन वाहतूक व तोडणीचा खर्च हा सरासरी १,००० रुपयांच्या घरात गेला आहे, असे दैनिक ‘पुढारी’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. काही कारखान्यांचा खर्च त्यापेक्षाही अधिक आहे. गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये जिल्ह्यात उस तोडणीचा खर्च १,०९६ कोटी २५ लाख रुपये झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या काही वर्षात ऊस तोडणी मजुरांचा टक्का घसरला आहे. यावर उपाययोजना सुरू असल्या तरी ही साखर उद्योगासाठी धोक्याची घंटा आहे. इंधनही महागल्याने वाहतूक दरावरही याचा मोठा परिणाम झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सोलापूर, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात उस तोडणीसाठी मराठवाड्यातील बीड, नांदेड, धाराशिव, जालना, जळगाव, यवतमाळ जिल्ह्यातील मजूर येत असतात. परंतु, आता या मजुरांची कमतरता भासत असल्याने दर वाढू लागले आहेत. त्यातच उसतोड महांमडळासाठीही ठराविक निधी कारखाने देत असल्याने त्याचाही बोजा शेतकऱ्यांवर पडत आहे. वाहतूक-तोडणीत साखर कारखाने शेतकऱ्यांकडून प्रतिटन १,००० रुपये वाहतूक व तोडणीचा दर आकारला जातो. मध्यंतरी उस तोड मजुरांची टंचाई भासू लागल्याने व आंदोलन पुकारल्याने मजुरीचे दर वाढवण्यात आले होते. कारखाने शेतकऱ्यांकडून १ हजार रूपये घेत असले तरी ते सर्व पैसे वाहतूकदार व मजुरांना मिळतात का? असाही सवाल होत आहे. याद्वारे कारखाने वाहतूकदार अन् मजुरांचीही लूट करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here