सातारा : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात आयोजित मोफत सर्वरोग आयुर्वेद निदान व आरोग्य तपासणी शिबिर झाला. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, किल्ले मच्छिंद्रगड यांच्या सहकार्यातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांच्या हस्ते झाले. शिबिरात १९८ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.
जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, सचिव सिद्धेश्वर शिलवंत, सरव्यवस्थापक (केन) दादासाहेब शेळके, पर्यावरण अधिकारी सुयोग खानविलकर, गोडावून किपर किशोर देशमुख, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील, स्टोअर किपर गोविंद मोहिते, अजित पाटील उपस्थित होते. कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल निकम, डॉ. स्वाती शिंदे, डॉ. मेघा शिंदे, डॉ. अमृता डुबल, डॉ. अदिती मस्कर, डॉ. धनश्री पोळ, डॉ. तेजस्वी मुळे, जनसंपर्क अधिकारी विराज कुलकर्णी आदींचे शिबिरास सहकार्य लाभले.


















