सातारा : कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी प्रचार सुरू, कपबशी विरुद्ध नारळ रंगणार युद्ध

सातारा : रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि. १०) चिन्हवाटप करण्यात आले. त्यावेळी सहकार पॅनलच्या उमेदवारांना कपबशी, तर संस्थापकच्या उमेदवारांना नारळ हे चिन्ह मिळाले आहे. सातारा व सांगली जिल्ह्यातील कराड, वाळवा, खानापूर व कडेगाव हे चार तालुके कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्याची निवडणूक ही महत्त्वपूर्ण मानली जाते. यंदाची निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार याबाबत उत्सुकता होती. प्रत्यक्षात दोनच पॅनल रिंगणात राहिले आहेत.

निवडणूक रिंगणात उतरलेल्या दोन अपक्ष उमेदवारांना ट्रॅक्टर व शिट्टी हे चिन्ह देण्यात आले आहे. कारखान्याची निवडणूक २१ जून रोजी होत आहे. मंगळवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी जयवंतराव भोसले सहकार पॅनल व आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनल अशा दोन पॅनलमध्ये लढत निश्चित झाली आहे. आता २१ जून रोजी निवडणूक होत आहे. विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुल भोसले सहकार पॅनलचे नेतृत्व करीत आहेत, विरोधी संस्थापक पॅनलचे नेतृत्व माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व त्यांच्या पत्नी अर्चना मोहिते करीत आहेत. आता आगामी दहा दिवस प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here