सातारा : कृष्णा साखर कारखान्याच्यावतीने शेतकरी संवाद मेळावा, कार्यअहवाल पुस्तिकेचे प्रकाशन

सातारा: य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने विंग (ता. कराड) येथे आयोजित शेतकरी सभासद संवाद मेळावा आणि कार्यअहवाल पुस्तिका प्रकाशन करण्यात आले. चेअरमन डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आ. आनंदराव पाटील, पं. स. सभापती नंदाताई यादव, जि.प. सदस्या शैलजा शिंदे यांसह कारखान्याचे संचालक उपस्थित होते. यावेळी कृष्णा कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ऐतिहासिक १४.१९ लाख मेट्रिक टन गाळप केल्याबद्दल आणि सभासदांना उच्चांकी ३५०० रुपयांचे ऊस बिल दिल्याबद्दल विंग परिसरातील सभासदांच्यावतीने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सुश्मिता जाधव, औरंग देसाई, मदनराव मोहिते, आनंदराव पाटील, शंकरराव खवाले यांनी मनोगत व्यक्त केले. जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या गेल्या ११ वर्षांतील गौरवशाली कार्यकाळाचा आढावा घेणाऱ्या ‘कृष्णा सहकाराचा गोड आदर्श’ या कार्यअहवाल पुस्तिकेचे प्रकाशन ज्येष्ठ सभासद शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

चेअरमन डॉ. भोसले म्हणाले की, काटकसरीने कारखाना चालवणे हेच आमचे सूत्र राहिले आहे. सभासदांचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. प्रामाणिकपणे काम केले तरच सहकार टिकतो, हे सूत्र समोर ठेवून आम्ही कृष्णा कारखान्यात नेहमी सभासद हिताचा कारभार केला. सभासदांना मोफत साखर देणारा आपला एकमेव कारखाना आहे. कारखान्याचे विस्तारीकरण करताना, आम्ही ऊसदरामध्ये कधीही तडजोड केली नाही. तसेच याचा सभासदांवर कोणताही अतिरिक्त भार पडू दिला नाही. सहकारामुळेच या भागाची खरी प्रगती झाली आहे. यावेळी प्रियांका साळुंखे, पं. स. सदस्य पैलवान धनंजय पाटील, अॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, अर्जुन कराळे, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, बाजार समितीच्या सदस्या रेखाताई पवार, कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, धोंडीराम जाधव, बबनराव शिंदे, बाजीराम निकम, आर. टी. स्वामी, सचिन पाचपुते यांसह संचालक उपस्थित होते. संचालक बबनराव शिंदे यांनी स्वागत केले. रामभाऊ सातपुते सूत्रसंचालन केले. हेमंत पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. सचिन पाचपुते यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here