सातारा : अजिंक्यतारा साखर कारखान्यात नव्या गळीत हंगामासाठी मिल रोलर पूजन उत्साहात

सातारा : शेंद्रे येथील अजिंक्यतारा कारखान्याच्या २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी यंत्रसामग्रीची देखभाल, दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत. हंगामाच्या पूर्वतयारीसाठी मशिनरी विभागातील मिलमधील पहिल्या रोलरचे पूजन रविवारी झाले. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन यशवंत साळुंखे, व्हाइस चेअरमन नामदेव सावंत, जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे, सूतगिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर, लालासाहेब पवार, किरण साबळे पाटील, जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेश टिळेकर, सातारा पंचायत समितीचे सभापती महेश गाडे आदी यावेळी उपस्थित होते. कारखाना यंदाच्या हंगामातही उसाला किफायतशीर दर देण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, यंदाच्या हंगामात उच्चतम साखर उतारा, कमीत कमी दिवसांमध्ये साखरेचे जास्तीत जास्त उत्पादन आणि उपपदार्थांच्या निर्मितीवर भर दिला जाणार आहे. प्रत्येक गाळप हंगाम यशस्वीकरून एफआरपीची १०० टक्के रक्कम शेतकऱ्यांना वेळेत अदा केली जात आहे. गाळपास आलेल्या उसाचे पेमेंट वेळेत अदा केल्याने सभासद आणि बिगर सभासदांमध्ये समाधान आहे. कारखान्यातर्फे गाळपास येणाऱ्या उसाला उच्चतम दर दिला जात आहे. सभासद शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न कारखाना व्यवस्थापनाने सत्यात उतरवले आहे, असेही ते म्हणाले.

ChiniMandi WhatsApp Channel

यावेळी बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, संचालक अरुण कापसे, विजय पोतेकर, रमेश चव्हाण, शैलेश आवळे, सर्जेराव सावंत, रामभाऊ जगदाळे, विश्वास शेडगे, नितीन पाटील, पांडुरंग साबळे, भास्कर घोरपडे, बजरंग जाधव, राजेंद्र घोरपडे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांसह अधिकारी व कामगार, सभासद उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here