सातारा : कृषी विभागाच्यावतीने खरीप पूर्वनियोजन मेळावा, शेतकऱ्यांना उसासाठी एआय तंत्रज्ञान वापराचा सल्ला

सातारा : शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगाम अधिक उत्पादनक्षम आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने शेरे येथे ‘खरीप हंगामपूर्व तयारी’ मेळावा पार पडला. मेळाव्यास तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, मंडळ कृषी अधिकारी विनोद कदम, सहाय्यक कृषी अधिकारी सारिका सरगर, विक्रम नलवडे, सारिका औताडे आणि रूपाली कुवर उपस्थित होते. तसेच य. मो. कृष्णा कारखान्याचे संचालक बाजीराव निकम, शेरे विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन अशोक पाटील, उमेदचे रेठरे प्रभाग समन्वय सुशांत तोडकर, ‘नीनाई’ व ‘शेराई’ शेतकरी महिला बचत गटातील सदस्य उपस्थित होते.

तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी ऊस पिकामध्ये एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून उत्पादन खर्च कसा कमी करावा आणि उत्पादन वाढवावे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करावा. ‘एल निनों’च्या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. विनोद कदम यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सारिका औताडे यांनी खरीप हंगामात ‘बियाणे उगवण क्षमता तपासणी’ आणि ‘बीज प्रक्रिया’ या विषयावर मार्गदर्शन केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here