सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा नामदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रामध्ये चांगली वाटचाल करत आहे. सध्या आपल्या कारखान्याचे विस्तारवाढ पूर्ण झाली असून यंदाचे गळीत हंगामाची पूर्वतयारी सुरु आहे. यंदाच्या गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवले आहे. गळीत हंगाम प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन यशराज देसाई यांनी केले.
दौलतनगर (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन २०२६-०२७च्या गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अशोकराव पाटील, पाडुरंग नलवडे, सुरज चव्हाण, प्रशांत पाटील, शशिकांत निकम, सोमनाथ खामकर, विजय सरगडे, अधिक देसाई पदाधिकारी, कार्यकारी संचालक एस. एल. देसाई यांच्यासह कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यशराज देसाई म्हणाले, सभासद शेतकऱ्यांचे आर्थिक जिवनमान उंचवणेसत्यात हे लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व. शिवाजीराव देसाई यांचे स्वप्न आपल्या उद्योग समूहाच्या व्यवस्थापनाकडून उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. कारखाना गळीत हंगामात यशस्वी गळीत करण्याची आपल्या कारखान्याची परंपरा जपली जावी.


















