सातारा : शरयू ॲग्रो करणार प्रतिदिन १२ हजार मे. टन ऊस गाळप, वाहतूक करारास प्रारंभ

सातारा : कापशी (ता. फलटण) येथील शरयू ॲग्रो साखर कारखान्याने आगामी सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाकरिता प्रतिदिन १२ हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेने कारखाना उसाचे गाळप करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आगामी गळीत हंगामात कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची गाळप क्षमता वाढवली जाणार आहे. याकरिता कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी वाहतूक कराराचा प्रारंभ वाहन ठेकेदारांच्या हस्ते करण्यात आला. कारखान्याचे संचालक अविनाश भापकर उपस्थित होते.

यावेळी व्यवस्थापनाने कार्यक्षेत्रातील तसेच लगतच्या क्षेत्रातील ऊस नोंदी घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. शेती विभागामार्फत चालू उसाची नोंद घेतील जात आहे. जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी आपला ऊस शरयू कारखान्याला नोंद करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्षेत्रातील स्थानिक वाहनधारकांनी आपले वाहतूक करार शरयू कारखान्याला करण्यासोबतच या गळीत हंगामात सक्रिय सहभाग नोंदवावा. यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर ऊस तोडणी आणि वाहतुकीची सुविधा मिळणार आहे असे सांगण्यात आले. यावेळी युनिट हेड विजय जगदाळे, शेती अधिकारी अशोक घाडगे, रमेश वाघ, डॉ. गणपत सावंत आणि कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख, तोडणी वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here