सातारा : सोनगाव-करंदोशीच्या माळावर गुडगुंटी-प्रतापगड शुगर्सच्यावतीने ऊस गाळपास प्रारंभ

सातारा : सोनगाव-करंदोशी (ता. जावली) येथील गुडगुंटी-प्रतापगड शुगर्स अँड बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने सन २०२६-२७च्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, माजी सभापती मोहनराव शिंदे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रवींद्र परामणे, कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव मर्डेकर, संचालक मंडळाचे सदस्य, परिसरातील शेतकरी उपस्थित होते. गुडगुंटी-प्रतापगड शुगर्स एनर्जींच अध्यक्ष विरुपाक्षय्या गुडगुंटी यांनी कारखान्याच्या वाढलेल्या गाळप क्षमतेची माहिती दिली. शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे म्हणाले की, आम्ही केवळ ऊस गाळणार नाही, तर शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. गुडगुंटी-प्रतापगडकडून स्पर्धात्मक दर दिला जाईल. कारखान्याची गाळप क्षमता आता वाढली आहे. ऊस गाळप क्षमता अडीच हजार टनावरून आता ३००० टन केलेली आहे. त्यामुळे तालुक्यातला ऊस कुठेही बाहेर न जाता तालुक्यातच आपल्या हक्काच्या कारखान्याला द्यावा, जावळी तालुक्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या नव्या युनिटमुळे ऊस गाळपाचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. आजूबाजूच्या कारखान्यांच्या तुलनेत स्पर्धात्मक दर देण्याचा प्रयत्न केला जाईल. कारखान्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यावर भर दिला आहे. ऊस उत्पादकांच्या आर्थिक हिताला प्राधान्य देत कारखान्याचे कामकाज पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here