सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याकडून ऊस तोडणी-वाहतूक करार

सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, पालकमंत्री शंभूराज देसाई व अध्यक्ष यशराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या गळीत हंगामात सर्वच विभागांनी चांगली कामगिरी केली. कारखान्याने कमी कालावधीत कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप पूर्ण केले. आता आगामी गळीत हंगाम २०२६-२७ ची तयारी सुरू आहे. त्याअंतर्गत कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास प्रारंभ झाला. ऊस वाहतूक कंत्राटदारांना उपाध्यक्ष पांडुरंग नलवडे, माजी अध्यक्ष अशोकराव पाटील, शिवाजीराव देसाई, ऊस तोडणी व वाहतूक सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजाराम जाधव आदींच्या यांच्या उपस्थितीत करारपत्राचे वितरण झाले.

याबाबत कारखान्याचे उपाध्यक्ष नलवडे म्हणाले की, आगामी गळीत हंगामासाठी नोंदविलेल्या संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण करण्याच्यादृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करण्याचे काम कारखाना व्यवस्थापनाने सुरू केले आहे. यापुढील काळात तांत्रिक आणि आधुनिक बदल करून त्याचा जास्तीत जास्त फायदा येणाऱ्या गळीत हंगामात होईल. ऊस तोडणी व वाहतूक सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष यादवराव तिकुडवे, संचालक शंकर पाटील, सुभाष गव्हाणे, संजय पवार, मयूर जाधव, कार्यकारी संचालक सुहास देसाई, शेती अधिकारी वैभव नलवडे व ऊस विकास अधिकारी प्रवीण भाट आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here